तरुणाची हत्या करून पसार झालेल्या आरोपीची गुन्हे शाखेने 8 तासात मुसक्या आवळल्या

Foto
औरंगाबाद : म्हाडा कॉलॉणीत मित्रासह  उभा असलेल्या  अक्षय महेश प्रधान या 22 वर्षीय तरुणाला  सापाची भीती दाखवून पैशे लुटल्यानंतर त्याची हत्या करून पसार झालेल्या दोघा पैकी गुन्हेशाखेच्या पथकाने  आठ तासाच्या आत एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या त्याच्या ताब्यातून एक मोटारसायकल जप्त केली आहे.दुसरा आरोपी फरार आहे पोलीस त्याचा शोध घेत आहे. इम्रान अमीर बेग वय-25 (रा.काबरानगर, गारखेडा परिसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे तर त्याचा साथीदार सोहेल पाशा शेख हा पसार आहे.

या हत्ये प्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, इम्रान हा भांगर खरेदी-विक्री चा धंदा करतो.सोमवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास अक्षय प्रधान आणि त्याचा मित्र अमेय भोसले हे दोघेही म्हाडा कॉलोनी भागातील मैदानात बोलत उभे असताना दरम्यान तेथे दोन्ही आरोपी आले त्यापैकी इम्रान च्या हातात साप होते.सापाची भीती दाखवत आरोपिना दोन्ही मित्रांना भीती दाखवली व अमेय च्या खिशातील 400 रुपये काढून घेतले.याला मृत अक्षय ने विरोध केल्याने आरोपी आणि अक्षय मध्ये झटापट झाली. अक्षय वरचढ ठरत असल्याने सोहेल ने त्याच्या कमरेला लावलेला धारधार चाकू काढला व अक्षयच्या छाती वर व मानेवर सपासप वार केले. धारदार चाकूच्या वार ने जखमा खोलवर  असल्याने अक्षय रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडला.व तेथून दोन्ही आरोपी मोटारसायकल वरून पसार झाले.अमेय ला काही समजण्याच्या आतच अक्षय गतप्राण झालं.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता एका ठिकाणी दोन्ही आरोपी हातात साप घेऊन टपरी वर उभे असल्याचे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले होते.त्या सीसीटीव्ही फुटेज च्या आधारावर गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीची ओळख पाठवीत त्याच्या घरावर सापळा लावला.पहाटे साडेचार च्या सुमारास इम्रान घरी येताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याने पोलिसांकडे खुनाची कबुली दिली.पुढील कारवाई साठी आरोपीस जवाहर नगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.ही कारवाई निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश धोंडे, हवलंदार सय्यद मुजीब,राजेंद्र साळुंखे राहुल खरात यांच्या पथकाने केली.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker